मुंबई |
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यभर पुन्हा आंदोलनाची ठिणगी पेटली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. तामिळनाडूच्या उदाहरणाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “तामिळनाडूत ७० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे, तर मग महाराष्ट्रात ते का शक्य नाही?
शरद पवारांच्या या वक्तव्याने मराठा समाजाच्या आंदोलनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करत असून, सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.
पवार म्हणाले की, “आरक्षणाबाबत फक्त कायदेशीर अडथळ्यांचा बाऊ केला जातो. पण जेव्हा इच्छाशक्ती असते तेव्हा मार्ग नक्की सापडतो. तामिळनाडूने हे दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातही सरकारने ठोस निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यायला हवा.”
दरम्यान, राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर विविध पावलं उचलली जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, समाजाकडून ठोस निर्णय आणि कायदेशीर हमीची मागणी होत आहे.

Comments
Post a Comment