मराठा आरक्षण आंदोलन: सरकारचा मोठा निर्णय, मराठा बांधवांना दिलासा.

मराठा आरक्षण आंदोलन: सरकारचा मोठा निर्णय, मराठा बांधवांना दिलासा

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर लाखो मराठा बांधव दाखल झाले असून समाजाच्या मागण्यांना वेग आला आहे.

सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून मराठा बांधवांना दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना फक्त एका दिवसाची परवानगी देण्यात आली होती. परंतु जनतेच्या प्रचंड उपस्थितीमुळे आणि मागणीच्या तीव्रतेमुळे दुसऱ्या दिवसासाठीही आंदोलनाची परवानगी मिळाली आहे.

मराठा समाजाची प्रमुख मागणी म्हणजे – ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे. हीच मागणी घेऊन हजारो कार्यकर्ते, युवक आणि महिला मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे आंदोलकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही तासांत सरकारची भूमिका स्पष्ट होणार असून मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला यामुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.



Comments